IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या ५२०८ जागांसाठी भरती | IBPS PO Bharti 2025
IBPS PO Bharti 2025: IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) मार्फत मोठी भरती करण्यात येणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. IBPS ने ‘प्रोबेशनरी ऑफिसर (PO)’ आणि ‘मॅनेजमेंट ट्रेनी (MT)’ या पदांसाठी एकूण ५२०८ जागांची घोषणा केली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात.
IBPS PO Bharti 2025
पदाचे नाव आणि तपशील:
- पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
- एकूण जागा: ५२०८
शैक्षणिक पात्रता(Eligibility for IBPS PO): कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा (०१ जुलै २०२५ रोजी):
- किमान वय: २० वर्षे
- कमाल वय: ३० वर्षे
- वयामध्ये सूट:
- SC/ST उमेदवारांसाठी: ०५ वर्षांची सूट
- OBC उमेदवारांसाठी: ०३ वर्षांची सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क:
- जनरल/OBC उमेदवारांसाठी: रु. ८५०/-
- SC/ST/PWD उमेदवारांसाठी: रु. १७५/-
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २१ जुलै २०२५
- पूर्व परीक्षा(IBPS Preliminary exam): ऑगस्ट २०२५
- मुख्य परीक्षा(IBPS Mains exam): ऑक्टोबर २०२५
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज (Apply online for IBPS PO) उपलब्ध आहेत.
शिवाय या भरतीसंदर्भात अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, कारण ही महाराष्ट्रातील आणि देशभरातील तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची एक सुवर्णसंधी आहे.
जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा – https://www.ibps.in/wp-content/uploads/Detailed-Notification_CRP-PO-XV.pdf