Tuesday, July 15, 2025
राज्य सरकार योजना

मातंग समाजासाठी स्वयंरोजगाराची संधी: अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून थेट कर्ज योजना | Anna Bhau Sathe Loan Scheme

Anna Bhau Sathe Loan Scheme: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाज आणि त्यांच्याशी संबंधित १२ पोटजातींमधील दारिद्र्यरेषेखालील गरजू घटकांसाठी एक थेट कर्ज योजना(Anna Bhau Sathe Loan Scheme) राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश या घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे ह्या समाजासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

Anna Bhau Sathe Loan Scheme

आता या योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा (Loan amount) २५ हजार रुपयांवरून वाढवून एक लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. एक लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ही योजना असून, यात महामंडळाचा हिस्सा ८५ टक्के, १० टक्के अनुदान आणि अर्जदाराचा हिस्सा ५ टक्के असणार आहे.

या योजनेमध्ये ग्रामीण भागातील अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे, राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबातील एका सदस्यालाही प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणून ही योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे.




कर्जासाठी पात्रता | Eligibility for Loan 
कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे संबंधित व्यवसायाचे पुरेसे ज्ञान, अनुभव किंवा प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच, अर्जदाराचा सिबिल स्कोअर(CIBIL Score) ६०० च्या वर असणे बंधनकारक आहे. अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करणे सुद्धा अनिवार्य आहे.

कर्ज मागणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २० जुलै आहे. इच्छुक अर्जदारांनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, भीग बाजार समोर, सोलापूर येथे संपर्क साधावा.

सोबतच हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे अनेक लोकांना ह्या योजनेचा फायदा होऊ शकेल.




Landagesuraj@9

I am a marathi blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *