पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना ₹15,000 चा बोनस, कंपन्यांनाही मिळणार फायदा! सरकारची मोठी घोषणा!
केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगाराच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी एक नवी योजना जाहीर केली आहे. ‘Employment Linked Incentive (ELI)’ नावाची ही योजना EPFO च्या माध्यमातून राबवली जाणार असून, पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या पात्र तरुणांना सरकारकडून थेट ₹15,000 ची प्रोत्साहन रक्कम (incentive) दिली जाईल.
Employment Linked Incentive Scheme
कोणाला मिळणार या योजनेचा लाभ | Benefits of Employment Linked Incentive ?
- ईपीएफओ (EPFO) च्या माहितीनुसार, ही योजना अशा तरुणांसाठी आहे जे प्रथमच नोकरी करत आहेत आणि EPFO मध्ये नोंदणीकृत आहेत. ज्यांची मासिक सॅलरी (salary) ₹1 लाख पर्यंत आहे, अशा पात्र तरुणांना दोन टप्प्यांमध्ये एकूण ₹15,000 ची प्रोत्साहन रक्कम मिळेल. ही रक्कम त्यांच्या ईपीएफ पगाराच्या (EPF salary) आधारावर दिली जाईल.
केवळ तरुणांसाठीच नव्हे, कंपन्यांनाही फायदाa
- हे प्रोत्साहन फक्त नोकरीस लागणाऱ्यांसाठीच नाही, तर कंपन्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2027 या दरम्यान नवीन कर्मचारी भरती करणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक कर्मचाऱ्यामागे दरमहा ₹3,000 प्रतिमहिना प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे कंपन्यांना भरती करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल.
योजनेचा उद्देश काय आहे?
- ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तरुणांसाठीच्या 5 योजनांच्या पॅकेजचा एक भाग आहे. सरकारचा उद्देश 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य विकास (skill development) आणि इतर सुविधांद्वारे सक्षम बनवण्याचा आहे. या उपक्रमांमुळे देशात कुशल कर्मचारी वर्ग तयार होईल आणि बेरोजगारीला आळा बसेल.
योजनेचा कालावधी आणि इतर फायदे
- या योजनेचा कालावधी 2 वर्षांचा असून, उत्पादन क्षेत्रातील (manufacturing sector) नियोक्त्यांना 4 वर्षांपर्यंत लाभ घेता येणार आहे. प्रोत्साहनाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर सरकार लाभार्थ्यांना ‘Financial Literacy’ कोर्स करून देईल, ज्यात बचतीसाठी मार्गदर्शन केले जाईल.
वरील माहिती ही अधिकृत स्रोतांवर आधारित असून यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. योजना लागू करण्यासंबंधी अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित यंत्रणेच्या सूचनांचा आधार घ्यावा.