Colgate Keep India Smiling Scholarship 2026-27

Colgate Keep India Smiling Scholarship 2026-27

तुम्ही मेडिकल किंवा डेंटल फील्डमध्ये शिक्षण घेत आहात का? तुमच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Colgate-Palmolive (India) Limited द्वारे ‘कीप इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल स्कॉलरशिप प्रोग्राम 2026-27′ (Colgate Keep India Smiling Scholarship 2026-27) सुरू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना ₹75,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

जर तुम्ही mahatoday चे नियमित वाचक असाल, तर या लेखात आपण या स्कॉलरशिपसाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.

Colgate Keep India Smiling Scholarship 2026-27: मुख्य वैशिष्ट्ये

वैशिष्ट्य तपशील
योजनेचे नाव Colgate Keep India Smiling Scholarship Program 2026-27
कोणाद्वारे दिली जाते? Colgate-Palmolive (India) Limited
कोणासाठी आहे? BDS आणि MDS अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी
आर्थिक लाभ ₹75,000 (एकवेळची स्कॉलरशिप)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन (Online Portal – Buddy4Study)

पात्रता निकष (Eligibility Criteria)

या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
    • BDS विद्यार्थ्यांसाठी: विद्यार्थ्यांनी 12 वी मध्ये किमान 65% गुण मिळवलेले असावेत आणि BDS च्या 2ऱ्या, 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षात शिकत असताना मागील सत्रात किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.
    • MDS विद्यार्थ्यांसाठी: विद्यार्थी MDS अभ्यासक्रमात शिकत असावेत आणि त्यांनी BDS मध्ये किमान 60% गुण मिळवलेले असावेत.
  • कौटुंबिक उत्पन्न (Family Income): अर्जदाराच्या कुटुंबाचे सर्व स्रोतांकडून मिळणारे वार्षिक उत्पन्न ₹8 लाख पेक्षा जास्त नसावे.
  • राष्ट्रीयत्व: विद्यार्थी भारताचा नागरिक असावा.
  • Preference: महाराष्ट्र, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधील विद्यार्थ्यांना या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाते.

ONGC Merit Scholarship 2026-27: पात्रता, अंतिम तारीख, मिळणारे लाभ आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (संपूर्ण माहिती)

आवश्यक कागदपत्रे (Required Documents) 

ऑनलाइन अर्ज करताना खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात:

  1. ओळखपत्र: आधार कार्ड (Aadhaar Card) किंवा कोणतेही शासकीय ओळखपत्र.
  2. पासपोर्ट साईज फोटो.
  3. उत्पन्नाचा दाखला: उत्पन्नाचा पुरावा (Income Certificate, Form 16A किंवा सॅलरी स्लिप).
  4. प्रवेश पुरावा: कॉलेजचे आयडी कार्ड किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र (Bonafide Certificate).
  5. शैक्षणिक गुणपत्रिका: 12 वी ची मार्कशीट आणि मागील सेमिस्टरच्या मार्कशीट.
  6. फी पावती: चालू शैक्षणिक वर्षाची कॉलेज फी पावती (Fee Receipt).
  7. बँक तपशील: बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक (विद्यार्थ्याच्या नावाचे बँक खाते असणे आवश्यक).

ऑनलाइन अर्ज कसा करावा? (How to Apply) 

Colgate Keep India Smiling Scholarship साठी अर्ज खालीलप्रमाणे उकल करू शकता:

  1. सर्वप्रथम अधिकृत पोर्टल Buddy4Study च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. होमपेजवर जाऊन Colgate Keep India Smiling Scholarship च्या पेजवर क्लिक करा.
  3. आपल्या मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा गुगल अकाउंटद्वारे Register / Login करा.
  4. त्यानंतर ‘Start Application’ बटनावर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करा.
  5. विचारलेली सर्व माहिती (वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक तपशील) काळजीपूर्वक भरा.
  6. मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  7. शेवटी अर्जाचे पुनरावलोकन (Preview) करून Submit करा आणि भविष्यासाठी अर्ज प्रिन्ट करून सुरक्षित ठेवा.
India AI Scholarship Program 2026–27: 100% Free Coaching & Scholarships for Students with Disabilities

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top