Business Loan scheme: तुम्हाला माहिती आहे का, सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींना, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या थेट उद्योग कर्ज (Business Loan scheme) योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी, एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू शकतं. चला तर, आज ह्या योजनेबद्द्ल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज आणि गट कर्ज योजना पुरवते. या योजना विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी आहेत. यात वैयक्तिक कर्जासाठी व्याज परतावा योजना, गट कर्जासाठी व्याज परतावा योजना आणि १ लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज योजना समाविष्ट आहेत. खालील सूचीतील 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी, वैयक्तिक किंवा गट कर्ज (Business Loan scheme) योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार आहे –
- मत्स्य व्यवसाय,
- कृषी क्लिनिक,
- पॉवर टिलर,
- हार्डवेअर शॉप,
- पेंट शॉप
- सायबर कॅफे,
- संगणक प्रशिक्षण,
- झेरॉक्स,
- स्टेशनरी,
- सलून,
- ब्युटी पार्लर,
- मसाला उद्योग,
- पापड उद्योग,
- मसाला मिर्ची कांडप,
- वडापाव विक्री केंद्र,
- भाजी विक्री केंद्र,
- ऑटोरिक्षा,
- चहा विक्री केंद्र,
- सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र,
- डी. टी. पी. वर्क,
- स्विट मार्ट,
- ड्राय क्लिनिंग सेंटर,
- हॉटेल,
- टायपिंग इन्स्टीट्युट,
- ऑटो रिपेअरींग वर्कशॉप,
- मोबाईल रिपेअरिंग,
- गॅरेज,
- फ्रिज दुरुस्ती,
- ए. सी. दुरुस्ती,
- चिकन शॉप,
- मटन शॉप,
- इलेक्ट्रिकल शॉप,
- आईस्क्रिम पार्लर
- मासळी विक्री,
- भाजीपाला विक्री,
- फळ विक्री,
- किराणा दुकान,
- आठवडी बाजारामध्ये छोटे दुकान,
- टेलिफोन बुथ,
- अन्य तांत्रिक लघु उद्योग.
सोबतच, या योजनेअंतर्गत प्राधान्य मिळणारी व्यक्ती खालील आहेत –
- शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय वा निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरूण मुले/मुली, आणि
- निराधार, विधवा महिला इ. लाभार्थी.
चला आता कर्ज वितरण हप्त्याचे स्वरूप बघूया. ह्या कर्ज योजनांसाठी योग्य लाभार्थ्यांची निवड व मंजूर प्रकरणात आवश्यक वैधानिक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर, कर्ज वितरण हप्त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल –
१. या कर्ज योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एक लाख रुपयांपैकी, पहिला हप्ता (७५%) म्हणजेच 75 हजार रुपये इतका असेल.
२. तर 25 हजार रुपयांचा दुसरा हप्ता, प्रत्यक्ष व्यवसाय सुरू झाल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार दिला जाईल.
ह्या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, व अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.vjnt.org/Default.aspx