मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला पडलेले प्रश्न | Mazi ladaki bahin yojana
Mazi ladaki bahin yojana – मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा तर केली परंतु तरी अनेक महिलांना ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेविषयी सविस्तर माहिती नाही. काळजी करू नका तुम्हाला या योजनेविषयी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखात दिलेली आहे.
प्रश्न : एका कुटुंबातील किती महिला यासाठी अर्ज करू शकतात?
उत्तर : एका कुटुंबा मधून फक्त आणि फक्त एकच विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोन जणी अर्ज करू शकतात. याहून जास्त असलेल्या महिलांना या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार नाही.
प्रश्न : हमीपत्र कसे भरावे?
उत्तर : हमीपत्र भरताना त्यावरती सर्व माहिती भरून जिथे खून करायची आवश्यकता आहे तेथे खून करून सही आणि दिनांक वेळ टाकावी.
प्रश्न : आम्ही यासारख्याच दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहोत तर आम्हालाही योजना लागू असेल का?
उत्तर : नाही ! जर तुम्ही यासारख्याच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना किंवा पीएम किसान योजना यासारख्या योजनांचा अगोदरपासूनच लाभ घेत असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
प्रश्न : हमी पत्रातील पाच आणि सहा नंबरचे कागदपत्र आमच्याकडे नाहीत?
उत्तर : चालेल हे कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य नाही
प्रश्न : काही डॉक्युमेंटचे आमच्याकडे झेरॉक्स आहे तर त्याचा फोटो काढून अपलोड केला तर चालेल का?
उत्तर : हो चालेल डॉक्युमेंट चा फोटो काढून अपलोड केला तरीही चालेल किंवा ओरिजनल मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स चा फोटो काढून अपलोड केला तरीही चालेल.
प्रश्न : मी या योजनेच्या वयोमर्यादा मध्ये बसत आहे परंतु जन्माचा दाखला मी आत्ता चालू वर्षी 2024 मध्ये काढलेला आहे. असे चालेल का?
उत्तर : हो तुम्ही चालू वर्षी जरी जन्माचा दाखला काढला असला तरी चालेल.
प्रश्न : उत्पन्नाचा दाखला आहे परंतु कोणत्या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला देऊ?
उत्तर : उत्पन्न दाखला हा चालू वर्षाचा म्हणजेच 2024 25 चा असणे आवश्यक आहे.
प्रश्न : फोटो काढल्यानंतर तो अपलोड केल्याच्या नंतर उद्या साईटला एका कोपऱ्यामध्ये लाल फुले येत आहे?
उत्तर : सदर लाल फुली ही अपलोड केलेला फोटो काढून टाकण्यासाठी आहे जर तुम्हाला तो फोटो काढून टाकून नवीन फोटो अपलोड करायचा असल्यास तेथे क्लिक करावे अन्यथा ते सोडून द्यावे.
प्रश्न : माझा जन्म दुसऱ्या राज्यात झालेला आहे परंतु जन्म ठिकाण म्हणून सिलेक्ट करताना ते राज्य येत नाही?
उत्तर : ही त्या ॲप मधील त्रुटी होती आता ही त्रुटी सुधारण्यात आलेली असून ॲप अपडेट करा किंवा रिफ्रेश करा.
प्रश्न : बँक पासबुक नाही, किंवा आहे परंतु अपलोड केलेच पाहिजे का?
उत्तर : नाही बँक पासबुक अपलोड करणे गरजेचेच नाही. तुम्ही बँक पासबुक अपलोड न करणे हा पर्याय सुद्धा निवडू शकता कारण येणारे पैसे हे आधार डीबीटी द्वारे येणार आहेत.
प्रश्न : माझ्याकडे पिवळे आणि केशरी दोन्ही रेशनिंग कार्ड नाही, मी कसा अर्ज करू?
उत्तर : तुमच्याकडे दोन्ही रेशनिंग कार्ड जरी नसले तरी उत्पन्नाचा दाखला तुमच्या कुटुंबाप्रमुखाचा जोडावा.
प्रश्न : मी अर्ज केला आहे परंतु फॉर्म अर्ज भरताना माझ्याकडून चुका झालेले आहेत. आता त्या दुरुस्त होतील का?
उत्तर : हो दुरुस्त होतील परंतु आता नाही सर्व अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला दुरुस्तीसाठी संधी देण्यात येईल तेव्हा त्यामधील चुका दुरुस्त करू शकता.
प्रश्न : मला अर्ज करायचे माहित नाही कसा अर्ज करू?
उत्तर : अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत तुम्ही अर्ज करू शकता.फक्त अर्ज करावा म्हणून सरकार त्यांना पन्नास रुपये देत आहे.
प्रश्न : अर्ज भरला आहे परंतु पावती मिळाली नाही. पावती कशी मिळवावी?
उत्तर : तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ॲप मध्ये लॉगिन करावे सर्व माहिती आणि तुमचे अर्जाचे स्टेटस समजून जाईल.
प्रश्न : माझ्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नाही, मग मी त्याला पर्याय म्हणून कोणते डॉक्युमेंट वापरू?
उत्तर : डोमेसाईल सर्टिफिकेट याला पर्याय म्हणून चार कागदपत्रे सांगितले आहेत ती खालील प्रमाणे रेशनिंग कार्ड मतदान कार्ड जन्माला दाखला शाळा सोडल्याचा दाखला.
प्रश्न : अर्ज करण्यासाठी असलेले संकेतस्थळ किंवा वेबसाईट सांगा?
उत्तर : अर्ज करण्यासाठी कोणतीही वेबसाईट उपलब्ध नाही अर्ज करण्याकरिता नारीशक्ती दुत ॲप द्वारे करू शकता त्याची नावे खालील प्रमाणे.
प्रश्न : नारीशक्ती हे ॲप चालतच नाही मग मी फॉर्म कसा भरू?
उत्तर : हे ॲप जर चालत नसेल तर रात्री बारानंतर किंवा पहाटे सकाळी लवकर उठून फॉर्म भरा. लाखोंच्या संख्येने महिला या योजनेसाठी अर्ज करत असल्याने ॲप मध्ये लिच किंवा एरर येऊ शकतो.
अर्ज फेटाळला जाऊ नये म्हणून काय करावे?
तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही या योजनेमध्ये बऱ्याचशा महिलांची जरी नाव कट होणार असले तरी ते त्यांच्या चुकीने होणार असून फॉर्म अर्ज व्यवस्थित न भरणे चुकीचा भरणे नियम व अटी न वाचणे वरील प्रश्न उत्तरे व्यवस्थित न वाचणे या गोष्टींमुळे हे नुकसान होणार आहे. त्यामुळे तुमचे पंधराशे रुपये बुडावे नाहीत असे तर वाटत असेल तर खालील चुका टाळा आणि आपले पैसे बुडण्यापासून वाचवा.
- अर्ज करताना डॉक्युमेंट साईज 5 एम बी होऊन कमी वापरा.
- रेशनिंग कार्ड अपलोड करणार असाल तर त्याचे पहिले आणि शेवटचे पान अपलोड करा आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे याचे खात्री करा.
- बँक खाते अपलोड करत असल्यास सिंगल खाते अपलोड करा जॉईंट खाते यासाठी चालणार नाही.
- पोस्ट खाते अपलोड करत असल्यास आय पी बी चेच अकाउंट अपलोड करा.
- तुमच्या सगळ्या कागदपत्रांवरती तुमचे सारखेच नाव आहे का याची खात्री करा काही कागदपत्रांवरती वेगळे नाव आणि काही कागदपत्रांवरती वेगळे नाव असे चालत नाही.
- नावाप्रमाणेच इतर सर्व माहिती सर्व कागदपत्रांवरती सारखीच असावी उदाहरणार्थ जन्मतारीख पत्ता
What to do to avoid rejection of application?
But you don’t need to worry, even though many women will be cut in this scheme, it will be due to their mistake and this loss will be due to the things like not filling the form properly, not reading the rules and conditions, not reading the above question answers properly. So if you don’t want your fifteen hundred rupees to go down, avoid the following mistakes and save your money from going down.
- Use document size less than 5 MB while applying.
If you are going to upload the ration card, upload the first and last page of the ration card and make sure that your name is there.
Upload single account if uploading bank account will not work for joint account.
If uploading post account, upload account of IPB itself.
Make sure that you have the same name on all your documents, it is not possible to have a different name on some documents and a different name on some documents.
Like name all other information should be same on all documents eg date of birth address
हे पहा लाखांच्या संख्येने महिला या योजनेसाठी अर्ज करत असून त्यामध्ये या योजनेचा लाभ मात्र सर्वच महिलांना मिळणार आहे असे नाही कारण या योजनेकरिता 45 हजार करोड रुपयांचा निधी उपलब्ध झालेला असून प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये दरमहा म्हणजे एका वर्षाचे 18 हजार रुपये मिळणार आहेत. त्यात एका कुटुंबात दोन तरी किमान महिला असतातच म्हणजे एका कुटुंबामध्ये 36 हजार रुपये वर्षाचे जमा होणार आहेत. निधी मात्र 45000 करोड इतकाच उपलब्ध झालेला आहे महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता त्यामध्ये महिलांची लोकसंख्या पाहता हा नदी पुरेसा नसून यामध्ये बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार देखील नाही.
Look at this, lakhs of women are applying for this scheme, but not all women are going to get the benefit of this scheme because 45 thousand crores of funds have been made available for this scheme and every woman will get Rs. There are at least two women in a family, which means that 36 thousand rupees will be accumulated in a family. However, the fund has been available only to the extent of 45000 crores, considering the population of Maharashtra, considering the population of women in it, this river is not enough and many women will not get the benefit of this scheme.