शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आता सरकारी परवानगी आवश्यक | New Rule: You Need a License to Buy from Farmers
New Rule: You Need a License to Buy from Farmers आपण बरेचदा अनुभवतो की, बाजारात शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य ती किंमत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप आर्थिक नुकसान होते. म्हणूनच, आपल्या महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करू इच्छिणाऱ्या कोणत्याही खाजगी व्यापाऱ्याला, राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यावरून दिसून येते की महाराष्ट्र सरकार शेतकरी हितासाठी काम करत आहे.
या निर्णयानुसार, शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करण्यासाठी बाजार समिती किंवा पणन विभागाच्या संचालकांकडून परवाना घेणे अनिवार्य असणार आहे. पणन संचालकांना देशभरात व्यापार करण्यासाठी व्यापाऱ्यांसाठी ‘सिंगल युनिफाइड परवाना’ जारी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
याशिवाय, मंत्रिमंडळाने पणन संचालकांच्या अखत्यारीत पणन समिती सचिवांचे एक स्वतंत्र केडर (पदांची श्रेणी) स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्यात राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही मंत्रिमंडळाने भर दिला आहे. ही केंद्रीय योजना महाराष्ट्रातील १३३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC) लागू केली जाईल. ‘ई-नाम’ हे एक अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल आहे, जे विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, मंडईंना जोडून शेतीमालासाठी एक एकीकृत राष्ट्रीय बाजारपेठ तयार करते.
हा निर्णय शेतीमालाच्या व्यापारात अधिक पारदर्शकता आणेल आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करेल अशी अपेक्षा आहे. म्हणूनच हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, व सर्व शेतकरी बांधव व व्यापाऱ्यांपर्यंत ही माहिती प्रसारित करा.