RBI Loans Made Easy with Gold & Silver: “रिझर्व्ह बँकेकडून शेतकऱ्यांना व लघु उद्योजकांना दिलासा! आता सोने-चांदीवरही मिळणार कर्ज
RBI Loans Made Easy with Gold & Silver: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शेतकरी आणि लघु उद्योजकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आता त्यांना कर्ज मिळवणे अधिक सोपे होणार आहे. आरबीआयने बँकांना सांगितले आहे की, ते कृषी आणि एमएसएमई (MSME) कर्जांसाठी सोने किंवा चांदी, तारण (collateral) म्हणून स्वीकारू शकतात. या निर्णयामुळे कर्जदारांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.
RBI Loans Made Easy with Gold & Silver
आरबीआयचा निर्णय काय आहे(RBI Loan Scheme)?
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, जर शेतकरी किंवा एमएसएमई युनिट्स ‘तारणमुक्त मर्यादा’ (free collateral limit) अंतर्गत स्वेच्छेने सोने किंवा चांदी तारण म्हणून देत असतील, तर बँकांनी ते स्वीकारण्यास हरकत नाही. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, हा निर्णय शेती आणि एमएसएमई(Farmer’s and MSMEs) यांना तारणशिवाय कर्ज देण्याच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत नाही, उलट त्यांना पूरक ठरणार आहे. यामुळे कर्जदारांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.
कोणत्या बँकांना हा नियम लागू असेल?
हा नवीन नियम खालील सर्व बँकांना लागू होईल:
- अनुसूचित व्यावसायिक बँका (Scheduled Commercial Banks)
- प्रादेशिक ग्रामीण बँका (Regional Rural Banks)
- लघु वित्त बँका (Small Finance Banks)
- राज्य सहकारी बँका (State Cooperative Banks)
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (District Central Cooperative Banks)
क्रेडिट रिपोर्टमधील समस्यांवर आरबीआयचे लक्ष
आरबीआयने क्रेडिट डेटाच्या अचूकता आणि डुप्लिकेशन सारख्या समस्यांवर लक्ष दिले आहे. यासाठी, केंद्रीय बँकेने वित्तीय व्यवस्थेत कर्जदारांच्या ‘एकल ओळखपत्र’ (Unique Borrower Identification – UBI) वर जोर दिला आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम. राजेश्वर राव म्हणाले की, देशाच्या क्रेडिट माहिती प्रणालीमध्ये ‘ओळख मानकीकरण’ (Identity Standardization) हे एक मोठे आव्हान आहे.
सध्या, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (Credit Information Companies – CIC) कर्जदारांची अचूक माहिती देण्यासाठी क्रेडिट संस्थांवर अवलंबून असतात. एकात्मिक ओळखपत्राच्या अनुपस्थितीत, डेटा डुप्लिकेशन आणि चुकीच्या अहवालांमुळे क्रेडिट मूल्यांकन आणि कर्ज निर्णय प्रक्रियेला धोका निर्माण होत आहे. यामुळे कर्ज मिळवणे काहीवेळा कठीण होते.