Saturday, May 3, 2025
राज्य सरकार योजनाशेतकरी योजना

शेळीपालन अनुदान योजनाः चला बघूया माहिती आणि अर्ज प्रक्रिया | Sheli Palan Yojana

शेळीपालन अनुदान योजना | Sheli Palan Yojana : ही योजना राज्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. ज्यांच्याकडे शेळ्या किंवा मेंढ्यांसाठी निवारा (शेड) नसतो, त्यांना राज्य सरकार निवारा बांधण्यासाठी १००% अनुदान देऊन आर्थिक मदत करते. तसेच, ज्यांच्याकडे कमी शेळ्या किंवा मेंढ्या आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो.




शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेळीपालन अनुदानाची रक्कम:
सध्या, शेळीपालन अनुदान योजनेसाठी शासनाकडून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. शासनाकडून लवकरच अनुदानात वाढ करण्यासंबंधी शासन निर्णय (GR) येण्याची शक्यता आहे. असा GR उपलब्ध झाल्यास, त्याची माहिती दिली जाईल. शेळ्या आणि मेंढ्यांसाठी निवारा बांधण्यासाठी ही योजना १००% अनुदानावर राबविली जाते.

योजनेचा उद्देश:
या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विकास करणे आहे. राज्य सरकार, रोजगार हमी योजनेद्वारे अर्जदारांना आर्थिक मदत करून रोजगार उपलब्ध करून देते. तसेच, शेळीपालनासाठी निवारा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा सुद्धा या योजनेचा हेतू आहे.

शेळीपालन अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड झेरॉक्स
  2. बँक पासबुक झेरॉक्स
  3. रेशन कार्ड झेरॉक्स
  4. घराचा ८ अ उतारा झेरॉक्स
  5. ग्रामपंचायत ठराव
  6. पासपोर्ट फोटो
  7. अनुसूचित जाती/जमाती असल्यास जातीचा दाखला
  8. वन अधिकार मान्यता असलेले वन प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  9. कुटुंब ओळखपत्र (जॉब कार्ड)




शरद पवार ग्राम समृद्धी शेळीपालन अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेळीपालन अनुदान अर्जावर ग्रामपंचायतीचे नाव, तालुका, जिल्हा आणि दिनांक नमूद करावा. पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता लिहावा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज ग्रामपंचायतीत जमा करावा. सोबतच अर्जाच्या झेरॉक्स प्रतीवर पावती घ्यावी.
शेळी निवारा (शेड) बांधकामाचा प्रकार:
योजनेचा लाभ घेण्यासाठी, शासनाच्या मानकांनुसार शेळीपालनासाठी निवारा बांधावा लागेल. यामध्ये काँक्रीटीकरण, सिमेंटची भिंत, लोखंडी किंवा सिमेंट पत्र्याचे छत यांचा समावेश असेल. निवारा बांधल्यानंतर, ५० हजार रुपये अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल.

निवारा बांधकामाचे प्रमाण/तपशील:
पूर्वसंमती मिळाल्यानंतर, १० शेळ्यांसाठी ७.५० चौरस मीटर आकाराचा निवारा बांधावा लागेल. निवारा बांधकामाची अंदाजित लांबी ३.७५ मीटर, रुंदी २.०० मीटर आणि उंची २.२० मीटर असावी.

शेळीपालन योजनेसाठी पात्रता:
शेळीपालनाचा लाभ घेण्यासाठी, मनरेगा योजनेच्या निकषानुसार पात्रता आवश्यक आहे. अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. तसेच, शेळीपालनासाठी वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या योजनेत भूमिहीन कुटुंबांना प्राधान्य दिले जाईल.
शेळीपालन योजनेसाठी अंदाजित रक्कम आणि अंमलबजावणी यंत्रणा:
१० किंवा त्याहून अधिक शेळ्या किंवा मेंढ्या असल्यास ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. शासनाने शेळी किंवा मेंढी निवारा बांधकामासाठी अंदाजित रक्कम १ लाख १० हजार रुपये देण्याचे ठरवले आहे. योजनेचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा




Landagesuraj@9

I am a marathi blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *