SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत 541 प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती
SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. म्हणून तरुणांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा. जाहिरात क्र. CRPD/PO/2025-26/04 नुसार, एकूण ५४१ जागांसाठी ही भरती होत आहे.
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
एकूण जागा : ५४१
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टरमध्ये आहेत, ते देखील यासाठी पात्र असतील. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी सुद्धा ह्या भरती चा लाभ घेऊ शकतात.
वयाची अट:
- १ एप्रिल २०२५ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) साठी ५ वर्षांची तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी ३ वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया(How to apply) आणि शुल्क:
- अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सामान्य (General), आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. ७५०/- आहे, तर अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ जुलै २०२५
- पूर्व परीक्षा: जुलै-ऑगस्ट २०२५
- मुख्य परीक्षा: सप्टेंबर २०२५
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असेल. या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या संधीचा लाभ घ्या आणि आपले भविष्य सुरक्षित करा!