Top Careers After 12th Science: बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य माहिती आणि आवडीनुसार पदवी अभ्यासक्रम निवडणे, आपल्या करिअर च्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आज आपण, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम पदवी अभ्यासक्रमांविषयी माहिती वाचूया.
Top Careers After 12th Science
१. विज्ञान पदवी (बी.एससी. – B.Sc)
जर तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित किंवा पर्यावरणशास्त्र या विषयांत रस असेल, तर बी.एससी. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
करिअर पर्याय: संशोधन शास्त्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा विश्लेषक, पर्यावरण सल्लागार, इत्यादी.
२. तंत्रज्ञान पदवी (बी.टेक. – B.Tech) / अभियांत्रिकी पदवी (बीई – BE)
अभियांत्रिकी पदवी, अनेक विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. त्यात अनेक मुख्य विषय किंवा स्पेशलायझेशन उपलब्ध आहेत, जसे की – संगणक विज्ञान, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल इत्यादी.
करिअर पर्याय: सॉफ्टवेअर इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, इत्यादी.
३. एमबीबीएस –MBBS (बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी)
जर तुम्हाला डॉक्टर व्हायचे असेल, तर एमबीबीएस हा तुमच्यासाठी सर्वोत्तम कोर्स आहे. अनेक विद्यार्थी आज ह्या विषयाचे स्वप्न पाहतात.
करिअर पर्याय: डॉक्टर, सर्जन, आरोग्यसेवा सल्लागार, वैद्यकीय संशोधक, इत्यादी.
४. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (BCA)
बीसीए तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये संगणक प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आयटी बद्दल विषय शिकविले जातात.
करिअर पर्याय: सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिस्टम अॅनालिस्ट, वेब डेव्हलपर, आयटी कन्सल्टंट, इत्यादी.
५. बॅचलर ऑफ फार्मसी (बी. फार्म – B. Pharm)
जर तुमची इच्छा औषधनिर्माणशास्त्रात करिअर करायची असेल, तर हा चार वर्षांचा अभ्यासक्रम तुमच्यासाठी एक संधी आहे.
करिअर पर्याय: फार्मासिस्ट, औषध सुरक्षा अधिकारी, क्लिनिकल संशोधक, वैद्यकीय विक्री प्रतिनिधी, इत्यादी.
याशिवाय, जर तुम्हाला लवकर नोकरी मिळवायची असेल, आणि दीर्घकालीन कोर्स करायचा नसेल, तर खालील २ वर्षांचे अल्पकालिक कोर्स तुमच्यासाठी योग्य ठरतील.
१. अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक)
मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा कोर्स करून, तुम्ही तंत्रज्ञ किंवा कनिष्ठ अभियंता म्हणून काम करू शकता.
करिअर पर्याय: तंत्रज्ञ, सीएडी ऑपरेटर, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक.
२. ग्राफिक डिझायनिंगमध्ये डिप्लोमा
जर तुम्ही सर्जनशील असाल आणि तुम्हाला डिझायनिंगमध्ये रस असेल, तर ग्राफिक डिझायनिंगमधील डिप्लोमा हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
करिअर पर्याय: ग्राफिक डिझायनर, वेब डिझायनर, डिजिटल आर्टिस्ट, क्रिएटिव्ह डायरेक्टर.
३. नर्सिंगमध्ये डिप्लोमा
वैद्यकीय क्षेत्रात करिअर सुरू करण्यासाठी, नर्सिंग डिप्लोमा अभ्यासक्रम योग्य पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला रुग्णसेवा आणि मूलभूत वैद्यकीय प्रशिक्षण मिळेल.
करिअर पर्याय: नर्स, हेल्थकेअर असिस्टंट, मेडिकल अटेंडंट.
४. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा
लग्न, कॉर्पोरेट कार्यक्रम, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांचे व्यवस्थापन करण्यासाठी या क्षेत्रात खूप संधी आहेत.
करिअर पर्याय: इव्हेंट मॅनेजर, वेडिंग प्लॅनर, कॉर्पोरेट इव्हेंट कोऑर्डिनेटर.
५. डिजिटल मार्केटिंग मध्ये डिप्लोमा
वरील कोर्समधून तुम्ही SEO, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, इत्यादी कौशल्ये शिकू शकता.
करिअर पर्याय: डिजिटल मार्केटिंग तज्ञ, एसइओ अॅनेलिस्ट, कंटेंट मार्केटर, सोशल मीडिया मॅनेजर.