चला आज बघूया, बारावीनंतर योग्य शैक्षणिक मार्ग कसा निवडायचा? | What Can I Do After 12th?
What Can I Do After 12th: बारावीची परीक्षा संपल्यानंतर तुम्ही पुढे भवितव्यासाठी योग्य मार्गाच्या शोधात आहात का? खरंतर तुमच्या आवडीनिवडी आणि करिअरच्या ध्येयांनुसार बारावीनंतर सर्वोत्तम अभ्यासक्रम निवडणे महत्त्वाचे आहे, परंतु अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे गोंधळ होऊ शकतो. म्हणूनच, तुम्हाला पदवी अभ्यासक्रम, डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) अभ्यासक्रमांमध्ये रस असो, आम्ही तुम्हाला आज सर्व काही सांगू.
बारावी पूर्ण झाल्यावर, विद्यार्थी पदविका किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम निवडू शकतात आणि त्यांच्या करिअरची सुरुवात करू शकतात. तसेच पदवी अभ्यासक्रमांमध्ये, तुम्ही वैद्यकीय, अभियांत्रिकी, डिझाइन, व्यवस्थापन आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये जाऊ शकता.
बारावीनंतरचे पीसीएम (PCM) अभ्यासक्रम म्हणजे, अभियांत्रिकी आणि मूलभूत विज्ञान. पण याव्यतिरिक्त, विद्यार्थी वाणिज्य आणि कला शाखेतील विविध अभ्यासक्रमांनाही जाऊ शकतात. अश्या प्रकारे, उत्तम संधींसाठी विद्यार्थी निवडू शकतील अशा अभ्यासक्रमांची यादी खालीलप्रमाणे आहे:
विज्ञान शाखा (PCM – Physics, Chemistry, Mathematics)
- B.Tech (Engineering)बी.टेक (अभियांत्रिकी)
- B.Arch (Architecture)बी.आर्क (वास्तुकला)
- B.Sc (Physics)बी.एस्सी (भौतिकशास्त्र)
- B.Sc (Mathematics)बी.एस्सी (गणित)
- B.Sc (Chemistry)बी.एस्सी (रसायनशास्त्र)
- BCA (Computer Applications)बीसीए (संगणक अनुप्रयोग)
- B.Sc (Computer Science)बी.एस्सी (संगणक विज्ञान)
- B.Sc (Information Technology)बी.एस्सी (माहिती तंत्रज्ञान)
- Commercial Pilot Training व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण
- B.Sc (Statistics)बी.एस्सी (सांख्यिकी
बारावीनंतरचे पीसीबी (PCB) अभ्यासक्रम बहुतेक विद्यार्थी डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट बनण्यासाठी पीसीबी शाखा निवडतात, म्हणून ते एमबीबीएस (MBBS), फार्मसी (Pharmacy) आणि बीडीएस (BDS) सारख्या अभ्यासक्रमांना जातात. पण याव्यतिरिक्त, ते होमिओपॅथी, फिजिओथेरपी, बायोटेक्नोलॉजी, पर्यावरण विज्ञान इत्यादी अभ्यासक्रम देखील निवडू शकतात.
बारावीनंतरचे हे पीसीबी अभ्यासक्रम विविध प्रतिष्ठित करिअरच्या संधी देतात. विद्यार्थी सहजपणे हॉस्पिटल, सायन्स लॅब किंवा संशोधन संस्थेत नोकरीच्या संधी शोधू शकतात किंवा नसेल तर ते खासगी प्रॅक्टिससाठी स्वतःचे क्लिनिक देखील उघडू शकतात.
विज्ञान शाखा (PCB – Physics, Chemistry, Biology)
- MBBS (Medicine)एमबीबीएस (वैद्यक)
- BDS (Dental Surgery)बीडीएस (दंत शस्त्रक्रिया)
- B.Pharm (Pharmacy)बी.फार्म (औषधनिर्माणशास्त्र)
- B.Sc (Nursing)बी.एस्सी (नर्सिंग)
- BHMS (Homeopathy)बीएचएमएस (होमिओपॅथी)
- BAMS (Ayurveda)बीएएमएस (आयुर्वेद)
- BPT (Physiotherapy)बीपीटी (फिजिओथेरपी)
- B.Sc (Biotechnology)बी.एस्सी (जैवतंत्रज्ञान)
- B.Sc (Environmental Science)बी.एस्सी (पर्यावरण विज्ञान)
- B.Sc (Microbiology)बी.एस्सी (सूक्ष्मजीवशास्त्र
बॅचलर ऑफ कॉमर्स (बी.कॉम) हा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर निवडला जाणारा अभ्यासक्रम आहे. तथापि, अनेक विद्यार्थी बारावी पूर्ण झाल्यावर उपलब्ध असलेल्या इतर अनेक अभ्यासक्रमांबद्दल माहिती नसल्यामुळे हा अभ्यासक्रम निवडू शकतात. वाणिज्य क्षेत्रात अभ्यासक्रमांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे, जी उच्च पगाराच्या आकर्षक करिअर संधींकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये गणित विषय घेतला नाही ते विद्यार्थी देखील गणिताची आवश्यकता नसलेले विविध वाणिज्य अभ्यासक्रम निवडू शकतात.
वाणिज्य शाखा
- B.Com (General)बी.कॉम (सामान्य)
- B.Com (Hons)बी.कॉम (ऑनर्स)
- BBA (Business Administration) बीबीए (व्यवसाय प्रशासन)
- CA (Chartered Accountancy)सीए (चार्टर्ड अकाउंटन्सी)
- CS (Company Secretary)सीएस (कंपनी सेक्रेटरी)
- CMA (Cost and Management Accountancy)सीएमए (खर्च आणि व्यवस्थापन लेखापरीक्षण)
- B.Sc (Economics)बी.एस्सी (अर्थशास्त्र)
- B.Com (Accounting and Finance)बी.कॉम (लेखा आणि वित्त)
- B.Com (Banking and Insurance)बी.कॉम (बँकिंग आणि विमा)
- BBA LLB (Integrated Law)बीबीए एलएलबी (एकीकृत कायदा
बारावीनंतर कला (Arts) शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बीए (BA) आणि बीएफए (BFA) हे सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत, जे त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यास मदत करतात. कला शाखेतील विद्यार्थी बीबीए (BBA) सारख्या वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमांना देखील जाऊ शकतात.
BA (General)बीए (सामान्य)
- BA (English)बीए (इंग्रजी)
- BA (Psychology)बीए (मानसशास्त्र)
- BA (Sociology)बीए (समाजशास्त्र)
- BA (Political Science)बीए (राज्यशास्त्र)
- BA (History)बीए (इतिहास)
- BFA (Fine Arts)बीएफए (ललित कला)
- BJMC (Journalism and Mass Communication)बीजेएमसी (पत्रकारिता आणि जनसंनाद)
- BSW (Social Work)बीएसडब्ल्यू (सामाजिक कार्य)
- B.Des (Fashion Design)बी.डेस (फॅशन डिझाइन)
- BHM (Hotel Management)बीएचएम (हॉटेल व्यवस्थापन)
- BA LLB (Integrated Law)बीए एलएलबी (एकीकृत कायदा)
- B.Sc (Psychology)बी.एस्सी (मानसशास्त्र)
- Diploma in Event Management – डिप्लोमा इन इव्हेंट मँनेजमेंट
- Diploma in Digital Marketing – डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग
ह्याचप्रकारे, बारावीनंतरचे पदविका (Diploma) अभ्यासक्रम सुद्धा महत्त्वाचे आहेत. खर्च आणि वेळेच्या दृष्टीने, बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम निवडणे सर्वोत्तम आहे. पदविका अभ्यासक्रम कमी खर्चात आणि कमी वेळेत पूर्ण करता येतात आणि ते सखोल ज्ञान देतात. बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्याला त्याचे/तिचे ध्येय निश्चित करावे लागेल, जसे की – इंटिरियर डिझायनर, शिक्षक, अभिनेता किंवा इतर.
डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रम (सर्व शाखेत उपयुक्त)
- Diploma in Graphic Design – ग्राफिक डिझाइन डिप्लोमा
- Diploma in Web Development – वेब डेव्हलपमेंट डिप्लोमा
- Diploma in Animation and VFX – अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स डिप्लोमा
- Diploma in Foreign Languages – परदेशी भाषेत डिप्लोमा
- Diploma in Travel and Tourism – प्रवास आणि पर्यटन डिप्लोमा
- Certificate in Digital Marketing – सर्टिफिकेट इन डिजिटल मार्केटिंग
- Certificate in Data Analytics – सर्टिफिकेट इन डेटा अॅनालिटिक्स
- Diploma in Interior Design – डिप्लोमा इन इंटीरियर डिझाइन
- Diploma in Photography – डिप्लोमा इन फोटोग्राफी
- Certificate in Financial Planning – सर्टिफिकेट इन फायनान्शियल प्लॅनिं
सोबतच, बारावी पूर्ण झाल्यावर, विद्यार्थी विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी आणि करिअर घडवण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम (अल्प-मुदतीचे) करू शकतात. या अभ्यासक्रमांना नोकरी-आधारित अभ्यासक्रम म्हणून देखील ओळखले जाते, कारण ते उमेदवारांना विशिष्ट नोकरीच्या भूमिकेसाठी तयार करतात. साधारणपणे, बारावीनंतरच्या प्रमाणपत्राच्या अभ्यासक्रमांचा कालावधी ६ ते १२ महिन्यांचा असतो.
प्रत्येक अभ्यासक्रमांतील विशेष कोर्सेस बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपण ह्या लिंक वर जाऊ शकता.
https://mhfauji.com/2025/05/career-options-after-12th/
तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मुलांना, मित्र–मैत्रिणींना, विद्यार्थ्यांना किंवा आप्तेष्टांना नक्की शेअर करा