Saturday, June 14, 2025
Education

Maharashtra SSC Result 2025: दहावीचा निकाल लागणार लवकरच! असा बघा तुमचा निकाल….

Maharashtra SSC Result 2025: बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. त्यामुळे, आता अनेक विद्यार्थी दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल पुढील आठवड्यात म्हणजेच १५ मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीच्या पाठोपाठ आता काही दिवसांतच दहावीचा निकाल लागणार असल्याने, उत्सुक विद्यार्थ्यांच्या मनात थोडी धाकधूक आणि उत्सुकता आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया की हा निकाल कुठे आणि कसा पहायचा आहे.

Maharashtra SSC Result 2025

दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
तुम्ही तुमचा दहावीचा निकाल तुमच्या मोबाईलवर सोप्या पद्धतीने पाहू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यासाठी काही अधिकृत वेबसाइट्स जारी करते. त्या खालीलप्रमाणे आहेत:

  •  mahahsscboard.in
  • mahresult.nic.in
  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • sscboardpune.in




ज्या दिवशी निकाल जाहीर होईल, त्या दिवशी या वेबसाइट्सला भेट देऊन, तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर तुमचा बैठक क्रमांक (सीट नंबर) आणि तुमच्या आईचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

डिजीलॉकर(Digilocker) वरून निकाल कसा डाउनलोड कराल?
तुम्ही तुमचा निकाल डिजिलॉकर या वेबसाइट किंवा ॲपच्या माध्यमातून देखील मिळवू शकता. यासाठी खालील प्रक्रिया करा:

  • सर्वात प्रथम डिजिलॉकरवर तुमचा आधार आयडी वापरून लॉग इन करा.
  • नंतर ‘SSC Result’ असे सर्च करा.
  • आता तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे.
  • सीट नंबर टाकल्यानंतर काही आवश्यक माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
  • तुम्ही हा निकाल डाउनलोड करून सुरक्षित ठेवू शकता.




दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या परीक्षेमुळे त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरते. मार्च महिन्यात दहावीची परीक्षा पार पडल्यानंतर, विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा विविध शाखांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतात. यासोबतच डिप्लोमासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्याचा पर्यायही त्यांच्याकडे असतो.

चला तर मग, तुमच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा!

Landagesuraj@9

I am a marathi blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *