Saturday, December 21, 2024
राज्य सरकार योजना

Shetkari Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार.

Maharashtra Shetkari Update: राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा विस्तार करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे या योजनेतून सन २०२५ पर्यंत सौर ऊर्जा निर्मितीची उद्दिष्ट १६,००० मेगावॉट विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मितीसाठी मान्यता देण्यात आली.



Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0

यामुळे राज्यातील संपूर्ण कृषी पंप धारकांना वीज पुरवठा करण्याचा  उद्देश साध्य होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत देण्यात येणारे आर्थिक सहाय्य सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

यात वीज उपकेंद्राची सुधारणा आणि देखभाल प्रोत्साहन, आर्थिक सहाय्य ग्रामपंचाय यांना यासाठी सन २०२४-२५  ते सन २०२८-२९ या कालावधीसाठी २,८९१  कोटी रुपये अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी सन २०२४-२५  या वर्षासाठी ७०२  कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी साठी मान्यता देण्यात आली आहे. 



महाराष्ट्रात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज  योजना २०२४  सुरू करण्यात आली त्यानुसार शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार राज्य सरकार उचलत असून राज्यातील ४४  लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या ७.५  HP क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवण्यात येणार आहे.  यासाठी १४,७६१  कोटी रुपये वार्षिक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महावितरणाचा सरासरी वीज खरेदीचा दर कमी होणार असून  यामुळे येणाऱ्या काळातील कृषी क्षेत्रासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भार शासनासाठी कमी होणार आहे.

 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *