पोस्ट ऑफिस योजना 2024 : दरमहा मिळवा साडेपाच हजार उत्पन्न | Post Office Yojana MIS
Post office yojana MIS
पोस्ट ऑफिस योजना 2024 : दरमहा मिळवा साडेपाच हजार उत्पन्न
पोस्ट ऑफिस ची एम आय एस योजना :
गुंतवणुकीचे पर्याय भरपूर आहेत परंतु तुम्ही केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असणे फार महत्त्वाचे आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकार तुम्हाला खूप चांगली संधी देत आहे. खूप लोकांना पोस्ट ऑफिस ची योजना सर्वात जास्त पसंत आहे कारण इथे तुम्हाला बचत सोबत खात्री सुद्धा मिळते. या योजनेमध्ये एका ठराविक एक रकमी ठेवीवरती दरमहा उत्पन्न मिळू शकते ते काहीही न करता. Post office yojana MIS
या योजनेमध्ये तुम्ही समजा जर नऊ लाख रुपये एक रकमे भरले तर त्याचे वार्षिक व्याजदर हे किमान 7.4 टक्के इतके राहील आणि याचा कालावधी पाच वर्षाचा राहील. यातून दरमहा मिळणारे उत्पन्न हे पाच हजार पाचशे पन्नास इतके राहील आणि याच्या व्याजातून होणारी कमाई ही तीन लाख तेहतीस हजार इतके राहील.
या योजनेमध्ये दोन प्रकारची खाती उघडता येतील एक एकल खाते आणि दुसरे संयुक्त खाते एकल खात्यामध्ये नऊ लाख रुपये पर्यंत रक्कम तुम्ही भरू शकता व संयुक्त खात्यामध्ये 15 लाखापर्यंत रक्कम भरू शकता तुमची इच्छा असल्यास मूळ रक्कम पाच वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर रिटर्न केली जाईल.
तुमच्या हातात येणाऱ्या रकमेवरती टॅक्स काढला जाईल परंतु तुमच्या मासिक उत्पन्नामध्ये टीडीएस कापला जात नाही.
वेळेपूर्वीची योजना बंद करायची असल्यास
Post office yojana MIS मॅच्युरिटीच्या अगोदरच जर तुम्हाला पैशांची गरज पडली आणि ते तुम्हाला काढायचे असल्यास तर ही सुविधा तुम्हाला कमीत कमी एक वर्षाच्या नंतर मिळेल त्या अगोदर ही रक्कम काढणे शक्य नाही आणि जर तुम्ही काढणारच असाल तर तुम्हाला त्यावरती दंड भरावा लागेल जर तुम्ही एक ते तीन वर्षाच्या मध्ये पैसे काढले तर तुम्हाला दोन टक्के पर्यंत रक्कम कमी केली जाईल. जर तुम्हाला पाच वर्षानंतर हे पैसे काढायचे नसतील आणि याची मदत वाढवायचे असेल तर मूळ रक्कम काढण्याचा किंवा या योजनेत वाढवण्याचा असे दोन्हीही पर्याय तुमच्याजवळ राहतील खात्यामध्ये मिळणारे व्याज हे बचत खात्यात ऑटोमॅटिकली भरण्याची सुद्धा योजना आहे. म्हणजेच यातून मिळणारे उत्पन्न हे तुम्ही न वापरता पुन्हा या गुंतवणूक करून याचे आणखीन पैसे सुद्धा वाढवू शकता.
Post office yojana MIS
पोस्ट ऑफिस ही अशा प्रकारची योजना आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पैशांविषयी खात्रीशीर गुंतवणूक करून मिळेल यामध्ये तुमचे पैसे नेहमी सुरक्षितच राहतात. यामध्ये कुठले फसवणूक वगैरे होत नाही त्याशिवाय ही योजना सरकारशी संबंधित असल्यामुळे झालेल्या फसवणुकीची रक्कम किंवा बुडालेले पैसे तुम्हाला नक्कीच रिटर्न मिळतील.
ज्या लोकांना त्यांची म्हातारपणाची सोय म्हणून काही ठराविक उत्पन्न दरमहा आम्ही असेल तेव्हा तुमच्या नोकरीच्या भरवशावर काम करून तुम्ही जे काही पैसे कमावले आहेत ते एक रकमी तुम्ही पोस्ट ऑफिस खात्यामध्ये जमा करून दरमहा पेन्शन प्रमाणे उत्पन्न मिळवू शकता. अशाच प्रकारच्या योजना जाणून घेण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा आणि या प्रकारच्या सर्व योजना आणि नोकरी बद्दल अपडेट मिळवा.
Post office yojana MIS
या योजनेचे पूर्ण नाव एम आय एस म्हणजे मंथली इन्कम स्कीम असे आहे याशिवाय याला पीओएमआयएस म्हणजेच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम असे देखील म्हणतात. यामध्ये दर महिन्याला ठराविक उत्पन्न मिळते म्हणून याला मासिक उत्पन्न योजना असे म्हटले जातेस नावाप्रमाणेच योजना आपल्याला दरमहा एक ठराविक उत्पन्न देते. ठराविक निश्चित परतावा देण्याची जिम्मेदारी ही पोस्ट ऑफिस योजना घेते.
Post office yojana MIS
या योजनेची वैशिष्ट्ये
- जास्तीची मर्यादा : तुम्ही नऊ लाख रुपयांपर्यंत एका व्यक्तीसाठी रक्कम जमा करू शकता आणि संयुक्त खाते उघडून दोन किंवा तीन लोकांसोबत संयुक्त खाते उघडून देखील 15 लाख रुपये पर्यंत रक्कम ठेवू शकता.Post office yojana MIS
- एकत्र खाते उघडण्याची सोय : संयुक्त खाते या नावाने तुम्ही दोन किंवा त्यापेक्षा यादीत व्यक्तींसोबत एकत्र खाते उघडून 15 लाख रुपयांची रक्कम एक रकमे ठेवू शकता.
- फक्त भारतीयांसाठी : ही योजना फक्त भारतातील रहिवाशांसाठी आहे प्रत्येक भारतीय नागरिक योजनेचा लाभ घेऊ शकतो. येणार आहे व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- स्वयंचलित पैसे काढण्याची सोय : या खात्यामध्ये असलेले पैसे तुम्ही ईसीएस आणि पीडीएफ या स्वयंचलित योजनेद्वारे मासिक व्याजाचे रक्कम दर महा काढू शकता.
- किमान रक्कम : या योजनेअंतर्गत किमान रक्कम ही हजार आणि 1000 च्या पटिमध्ये उघडता येते.
- लॉक इन पिरेड : या योजनेमध्ये एकदा तुम्ही एक रकमे पैसे गुंतवल्यानंतर तुम्ही पाच वर्षाच्या अगोदर हे पैसे काढू शकत नाही. यामुळे तुम्हाला बचतीची सवय लागते आणि यामध्ये तुमचाच फायदा होतो. Post office yojana MIS
- इमर्जन्सी साठी : अडचणीच्या काळात तुम्ही लॉकिंग पिरेड तोडून यातले पैसे काढू शकता परंतु त्यासाठी तुम्हाला दंड भरणे अनिवार्य आहे परंतु दंड भरण्याची तयारी असल्यास तुम्हाला तुमच्या गरजेपुरते पैसे हवे तेव्हा काढून घेता येऊ शकतात.
- खाते ट्रान्सफर करू शकता : जर तुमची कामानिमित्त वेळोवेळी बदली होत असेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यात जावे लागत असेल तर तुमची तुम्ही गरजेनुसार तुमची पोस्ट ऑफिसचे खाते वेगवेगळ्या जिल्ह्यात ट्रान्सफर करून घेऊ शकता.
लहान मुलांसाठी सुद्धा योजना : जर तुम्हाला मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने खाते उघडून त्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता तर यासाठी मुलांचे किमान वय हे दहा वर्षे असले पाहिजे आणि याचा परताव्याची रक्कम ही त्यांच्या अठरा वर्षाच्या नंतर मिळेल.
Indian post