नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजनेचा टप्पा-२ सुरू! | Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalp
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalp: महाराष्ट्रातील शेतीत हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प” (पोकरा योजना – PoCRA Yojana) अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प, ज्याला “Project on Climate Resilient Agriculture” असेही म्हणतात, शेतकऱ्यांना हवामान बदलांशी जुळवून घेण्यास, उत्पादनात सातत्य राखण्यास आणि आर्थिक जोखीम कमी करण्यास मदत करेल. आता हा प्रकल्प टप्पा-२ मध्ये प्रवेश करत आहे, ज्यामध्ये व्यापक उपाययोजना आणि अधिक जिल्ह्यांचा समावेश असेल.
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalp
मुख्य उद्दिष्ट्ये:
- हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या शेतीच्या समस्यांवर उपाययोजना करणे.
- मातीचे पोषण, पाणी साठवण, सेंद्रिय शेती, पीक पद्धतीत सुधारणा करणे.
- उत्पादनात वाढ, शेतीतील जोखीम कमी करणे, आणि शाश्वत शेतीची अंमलबजावणी करणे.
- डिजिटल साधनांचा वापर आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रसार करणे.
टप्पा-२ मध्ये काय विशेष?
जुलै २०२५ मध्ये शासनाने या प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी मंजुरी दिली आहे. यात खालील महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे:
- एकूण गुंतवणूक: सुमारे ६००० कोटी रुपये.
- निधीची उपलब्धता: यापैकी ७०% निधी (₹४२०० कोटी) जागतिक बँकेकडून अल्प व्याज दराने कर्ज म्हणून उपलब्ध होईल, तर उर्वरित ३०% निधी (₹१८०० कोटी) राज्य शासनाकडून दिला जाईल.
- व्याप्ती: टप्पा-२ मध्ये २१ जिल्ह्यातील ७२०१ गावांचा समावेश असेल. यामुळे लाखो शेतकरी, शेती गट, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था आणि शाश्वत शेती करणारे लाभार्थी जोडले जातील.
कोणते जिल्हे समाविष्ट आहेत (PoCRA Yojnna Districts list)?
- पोकरा योजना टप्पा-२ मध्ये महाराष्ट्रातील खालील २१ जिल्ह्यांतील ७२०१ गावांचा समावेश आहे:
अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नांदेड, लातूर, बीड, परभणी, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, धाराशिव.
लाभार्थी कोण(Beneficiaries of PoCRA Yojna)?
पोकरा (PoCRA Yojana) योजनेचा लाभ खालील घटकांना मिळणार आहे:
- ५ हेक्टरपर्यंत जमीनधारक असलेले शेतकरी.
- महिला, अनुसूचित जाती व जमाती, दिव्यांग व सर्वसाधारण घटकातील शेतकरी.
- स्वयं सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, गटशेती करणारे शेतकरी.
- विशेषतः: हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करणाऱ्यांना प्राधान्य.
अनुदान देण्याची पद्धत:
- लाभार्थ्यांना DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने आधार लिंक केलेल्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल.
- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनुदान दर लागू राहतील.
प्रकल्प कालावधी:
- २०२५-२६ पासून पुढील ६ वर्षे पोकरा (PoCRA Yojana) योजनेचा टप्पा-२ राबवला जाणार आहे.
- दरवर्षी वित्त विभागाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.
प्रकल्पात कोणते घटक असणार?
- मृदा आरोग्य चाचणी
- शाश्वत पीक पद्धती
- जैविक आणि सेंद्रिय शेती
- पाणी साठवण क्षमता वाढविणे
- महिला सहभाग वृद्धिंगत करणे
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संपर्क:
अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहायक किंवा समूह सहायकांच्या संपर्कात साधावा, असे आवाहन महाराष्ट्र कृषी विभागाने केले आहे.
संकेतस्थळ: https://mahapocra.gov.in
ईमेल: mahapocra@gmail.com / pmu@mahapocra.gov.in
फोन: ०२२ – २२१६३३५१
या लेखात, आम्ही पोकरा योजनेच्या दुसऱ्या टप्पा सुरु (PoCRA Yojana) बद्दल माहिती दिली आहे. हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल घडवून आणेल.