Tuesday, September 17, 2024
केंद्र सरकार योजनाराज्य सरकार योजनाशेतकरी योजना

E-Pik Pahani: ई-पिक पाहणी कशी करावी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

E-Pik Pahani : नमस्कार मित्रांनो आज आपण ई-पिक पाहणी कशी करावी तसेच त्याचे फायदे देखील जाणून घेणार आहोत तर आपण जर शेतकरी असाल तर हि माहित तुमच्यसाठी महत्वाची आहे.

ई- पाहणी कशी करायची ?

ई-पिक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांना स्वतः आपल्या शेतातील लागवड केलेल्या पिकांची माहिती ऑनलाइन ॲपच्या मदतीने देणे म्हणजे ई-पीक पाहणी होय . राज्य सरकार गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे २०२४  च्या खरीप हंगामासाठी ही पीक पाहणी करण्याचा कालावधी १ ऑगस्ट  पासून सुरू झाला असून त्याची शेवटची तारीख १५  सप्टेंबर २०२४ आहे .

 



आपल्या शेतीच्या सातबारावर पिकाची नोंद करण्यासाठी सर्वात प्रथम आपणास ई-पिक  पाहणी ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करायचे आहे . ॲप चे नाव आहे E-Peek Pahani (DCS) हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करायचे आहे त्यानंतर ॲप वापरण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींना परवानगी द्यायची आहे नंतर पेज उजवीकडे सरकवायचे आहे परत पेज उजवीकडे सरकावून त्यात आपल्या महसूल मंडळाची निवड करावी त्यानंतर ,शेतकरी म्हणून लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यात मोबाईल नंबर टाकायचा आहे पुढे विभाग, जिल्हा, तालुका,आणि तुमच्या गावाचं नाव निवडायचे आहे. आता पहिले, मधले किंवा आडनाव तसेच गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता, इथे गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून आपला  गट क्रमांक प्रविष्ट करून शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग त्या गट नंबर मध्ये असणारे सर्व खातेदार तुम्हाला दिसतील खातेदाराने स्वतःचे नावावर क्लिक करून पुढे सांकेतांक पाठवा ओटीपी नावाचा पेज ओपन होईल.

आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे अशी सूचना तिथे दिलेली असेल, पण तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास तुम्ही बदलू शकता अथवा पुढे या पर्यायावर क्लिक करू शकता तुम्ही जर तुम्ही गेल्या वर्षी या ॲपवरून नोंदणी केली असेल तर तुम्हाला पुढे जायचे आहे का असे दाखवले जाईल परंतु तुम्ही नवीन असाल तर तुम्ही खातेदाराचे नाव निवडून मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करून पुढे जाऊ शकता.

आता तुम्ही होम या पेजवर आला असाल तिथे तुम्ही पिक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करून त्यात आपला खाते क्रमांक, गट क्रमांक निवडल्यावर तुम्हाला लागवडीखाली जमिनीची एकूण क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र ऑटोमॅटिक दिसेल. आपल्या क्षेत्रफळाची खात्री करून पुढे खरीप हंगाम निवडून पिकाचा वर्ग जसे की एक पीक आहे की मिश्र पीक निवडून त्याचा प्रकार, पिकाचे नाव आणि क्षेत्र हेक्टर व आर मध्ये भरायचे आहे ही माहिती भरल्यानंतर जलसिंचनाचे साधने यावर क्लिक करून आपल्या सिंचन साधनांची निवड करावी जसे तलाव, विहीर, बोरवेल इत्यादी. जर तुमच्याकडे पाण्याचे साधन उपलब्ध नसेल तर कोरडवाहू या पर्यायावर क्लिक करून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.



आता ज्या गटातील पिकाची आपण नोंद करत आहात त्यात त्या पिकांची दोन फोटो घेणे अनिवार्य आहे. छायाचित्र एक या पर्यावर क्लिक करून पिकाच्या जवळ जाऊन एक फोटो काढायचा आहे नंतर छायाचित्र दोन या पर्यायावर क्लिक करून पुन्हा पिकाच्या जवळ जाऊन थोडा वेगळ्या पद्धतीने फोटो घ्यायचा आहे. खाली असलेल्या बरोबर या पर्यावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती एकदा तपासून घ्यायची आणि घोषणेवर या पर्यावरण टिक करून पुढे या पर्यायावर क्लिक करायचे आहे आता तुम्हाला पीक माहिती साठवली आहे असा पॉप-अप मेसेज दिसेल नंतर ठीक आहे या पर्यायावर क्लिक करायचे आहे .

तुम्ही नोंदविलेला पिकाची माहिती पाहण्यासाठी तेथे असणाऱ्या पिकाची माहिती पहा या पर्यावरण क्लिक करून भरलेली माहिती पाहू शकता ही माहिती तुम्ही ४८ तासांच्या आत दुरुस्त किंवा नष्ट करू शकता. अशाच प्रकारे तुम्हाला दुसऱ्या गटातील पिकाची नोंदणी करण्यासाठी हीच प्रक्रिया फॉलो करावी लागेल या ॲपवरून तुम्ही कायम पड बांधावरची झाडही नोंदवू शकता . आपण केलेल्या पिक पाहणीची खात्री करून घेण्यासाठी गावातील खातेदारांची पिक पाहणी या पर्यावर क्लिक करून आपले नाव हिरव्या बोल्ड अक्षरात आहे का तपासावे आणि त्या समोरील डोळा या पर्यायावर क्लिक करून आपण नोंदविलेल्या पिकाची माहिती आपण पाहू शकता.



ई-पिक  पाहणीचे फायदे?

ई-पिक पाहणी करताना दिलेल्या माहितीचा वापर भरपूर कामांसाठी होतो.

१. तुमचा शेतमाल तुम्हाला किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठी या माहितीचा वापर होतो.

२. पीक कर्जाच्या वेळी या माहितीचा वापर पडताळणीसाठी केला जातो .

३. पिक विमा भरताना नोंदविलेले पीक आणि ई-पीक पाहणी द्वारे नोंदवलेले पीक यात तफावत आढळल्यास पिक पाहणी केली पीक अंतिम ग्राह्य धरले जाते.

४. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सरकारकडून भरपाई मिळण्यासाठी याचा वापर होतो.



या पूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान काही शेतकऱ्यांना ॲप व्यवस्थित न चालणे ,पिकाची नोंद केल्यावर एरर येणे, पीक माहिती नोंदवली तरी दिसण्यास अडथळा येणे अशा समस्या सध्या उद्भवत आहेत.

तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना हि माहिती पाठवा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *