Tuesday, October 15, 2024
Blog

दिव्यांग अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य | Financial help for the self-employed for disabled people

Financial help for the self-employed for disabled people

दिव्यांग अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य | Financial help for the self-employed for disabled people

 

महाराष्ट्र राज्य सरकारच्या Social Justice and Special Assistance (SJSA) सोशल जस्टीस अँड स्पेशल असिस्टंट म्हणजेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची अंतर्गत ही योजना राबविली जात  आहे. या योजनेचे संपुर्ण नाव हे ‘स्वयंरोजगारासाठी अपंगांना आर्थिक सहाय्य योजना’ असे आहे. सुशिक्षित बेरोजगार आणि दिव्यांग असलेल्या तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून देणे हे या योजनेतील मूळ उद्दिष्ट आहे. लघुउद्योग, कृषी आधारित प्रकल्प तसेच स्वयंरोजगार या गोष्टींसाठी दिव्यांग सुशिक्षित तरुणांना अर्थसाह्य या योजनेद्वारे दिले जाईल. योजना राज्य सरकारकडून अनुदानित असून या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी आणि भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. योजना शंभर टक्के राज्य अनुदानित आहे.

या योजनेचे मूळ उद्दिष्ट हे दिव्यांग आणि बेरोजगार व्यक्तींना स्वयंरोजगार मिळवून देणे आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे करून त्यांना स्वावलंबी बनवणे आणि समाजाचा एक कृतिशील घटक म्हणून त्यांना जीवन जगता यावे यासाठी अपंग दिव्यांग लोकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करून या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा उद्योग धंदा व्यवसाय किंवा शेतीशी निगडित एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्यक हे राष्ट्रीयकृत असलेल्या बँकेतर्फे परतफेडीच्या रूपाने सरकार उपलब्ध करून देत आहे. 

Financial help for the self-employed for disabled people

या योजनेसाठी कोण पात्र आहेत?

  1. महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असलेला अर्जदार
  2. लाभार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  3. अपंगत्वामध्ये अस्ति व्यंग,  नेत्रदोष (अजिबात न दिसणे किंवा कमी दिसणे) श्रवणदोष हे व्यंग येतील.
  4. लाभार्थी हा अपंग असण्याची टक्केवारी ही 40% हून अधिक असावी.
  5. लाभार्थी साठी वयोमर्यादा ही 50 पर्यंत आहे. यासाठी कमीत कमी वय हे अठरा वर्ष असावे. 
  6. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वर्षाचे उत्पन्न हे एक लाखाहून कमी असावे.

 

या योजनेअंतर्गत काय फायदे होणार आहेत?

  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडून तीस हजार रुपया पर्यंतच्या रकमेचे 20 टक्के हे अनुदान स्वरूपात दिले जातील.
  • 80 टक्के रक्कम ही बँकेद्वारे दिली जाते.
  • जास्तीत जास्त दीड लाखा रूपये पर्यंत आर्थिक सहाय्य शासना तर्फेदिले जाईल.

 

 

असा करावा अर्ज

  1. जिल्हा समाज कल्याण कार्यालय यांच्या ऑफिस वरती भेट देऊन योजनेचा अर्ज मागावा.
  2. अर्जामध्ये मागितल्याप्रमाणे सर्व माहिती भरावी.
  3. दोन पासपोर्ट साईज फोटो जोडावेत.
  4. मागितलेली सर्व कागदपत्रे जोडावी.
  5. आवश्यक ठिकाणी स्वाक्षरी करावी.
  6. रीतसर पूर्णपणे भरलेला फॉर्म जिल्हा समाज कल्याण कार्यालय येथे नेऊन जमा करावा.
  7. अर्जामध्ये ज्या ठिकाणी ‘*’ (स्टार) असेल ती माहिती भरणे अनिवार्य आहे असे समजावे.
  8. हे अर्ज भरताना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याची अर्जदाराला माहिती असणे गरजेचे आहे. 

Such an application should be made

  1. Apply for the scheme by visiting the office of District Social Welfare Office.
  2. Fill all the information as asked in the application form.
  3. Attach two passport size photographs.
  4. Attach all the requested documents.
  5. Sign at required places.
  6. The duly filled form should be taken and submitted to the District Social Welfare Office.
  7. Where ‘*’ (star) appears in the application form, it should be considered mandatory to fill the information.
  8. No fee is charged while filling this application. The applicant must be aware of this.

Financial help for the self-employed for disabled people

यासाठी काय कागदपत्रे लागू शकतात?
  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • शासनाने दिलेले अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • बँकेचे डिटेल्स ( उदाहरणार्थ बँकेचे नाव, आय एफ एस सी नंबर आणि शाखा इत्यादी)
  • उत्पन्नाचा दाखला (या योजनेसाठी उत्पन्नाशी निगडित कुठल्याही प्रकारचे नियम नाहीत)
  • लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे याचा पुरावा.
  • इयत्ता दहावी किंवा बारावीचे गुणपत्रक किंवा जन्म प्रमाणपत्र या दोन्हीपैकी एक.

 

What documents can be required for this?

  • Aadhaar Card PAN Card
  • Two passport size photographs
  • Disability certificate issued by Govt
  • Bank details (eg bank name, IFSC number and branch etc.)
  • Income Proof (There is no income related rule for this scheme)
  • Proof that the beneficiary is a resident of Maharashtra.
  • Either Class 10th or 12th Mark Sheet or Birth Certificate.

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

www.sjsa.maharashtra.gov.in/en/contacts.php

अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या खालील पत्त्यावर भेट द्या.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पत्ता शंकर शेठ रोड, 437, पोलीस कॉलनी, स्वारगेट, पुणे –  411042 महाराष्ट्र.

For more information visit the website below.

www.sjsa.maharashtra.gov.in/en/contacts.php

For more information visit Social Justice and Special Assistants Department at below address.

Address of Department of Social Justice and Special Assistance, Shankar Sheth Road, 437, Police Colony, Swargate, Pune – 411042 Maharashtra.

Financial help for the self-employed for disabled people

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.

Financial help for the self-employed for disabled people

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *