Tuesday, October 15, 2024
शैक्षणिक योजना

ITI विद्यार्थीसाठी स्टायपेंड योजना | ITI students scheme Maharashtra – Mahatoday

ITI students scheme Maharashtra – Mahatoday

ITI विद्यार्थीसाठी स्टायपेंड योजना | ITI students scheme Maharashtra – Mahatoday

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचा अंतर्गत इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITI) म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील शेड्युल कास्ट (SC) म्हणजेच अनुसूचित जाती मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव “औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींना मानधन”  आहे. विद्यार्थी वर्गातील मुलांना  नोकरी आणि नोकरीसाठीच्या संधी निर्माण करून देणे तसेच नोकरीसाठी त्यांना पूर्व प्रशिक्षण देऊन त्यासोबतच त्यांना मानधनही देणे याकरिता या योजनेची स्थापना केली जात आहे. 

या योजनेअंतर्गत एकूण शंभर रुपये दरमहा विद्यार्थ्यांना दिले जातात. त्यातील चाळीस रुपये हे समाज कल्याण विभाग मार्फत दिले जातात. तर त्यातील एसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे की वस्तीगृहात राहत आहेत आणि तंत्र विद्येचे शिक्षणही घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत साठ रुपये दिले जातात.

 

या योजनेसाठी कोण पात्र राहील ?

  1. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये लाभार्थी शिक्षण घेत असला पाहिजे याशिवाय ती संस्था मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे.
  2. लाभार्थी हा फक्त आणि फक्त शेड्युल कास्ट (SC) म्हणजेच अनुसूचित जाती जमातीतील      असावा.
  3. लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 65,000/- हून कमी असावे.
  4. लाभार्थ्याला त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी अर्ज केला आहे आणि त्याचा काय लाभ होणार आहे याची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
  5. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असावा.
  6. लाभार्थी हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.

 

या योजनेद्वारे काय लाभ होतील?

या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना व्यापार नोकरी आणि व्यवसाय यामध्ये प्रगती करता यावी यासाठी योजनेची स्थापना केली गेली असल्या मुळे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवसाय नोकरी विषयी प्रशिक्षण सोबत स्टायपेंड ही दिला जाणार आहे मिळणार आहे.

यामध्ये कितीच स्टायपेंड दिले जाईल?

  1. शंभर रुपये या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागाकडून  दरमहा विद्यार्थ्यांना दिले जातात. 
  2. चाळीस रुपये हे समाज कल्याण विभाग मार्फत दिले जातात. यासाठी विद्यार्थी संस्थेच्या वस्तीगृहात राहणे आवश्यक आहे 
  3. साठ रुपये हे ‘एस सी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे की वस्तीगृहात राहत आहेत आणि तंत्र विद्येचे शिक्षणही घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत दिले जातात.

 

असा करा अर्ज
  1. या योजनेसाठी अर्ज हा फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करता येतो.
  2. संबंधित विद्यार्थी हा त्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांशी जाऊन याविषयी अधिक माहिती घेऊन अर्जाचे स्वरूप प्राप्त करावे.
  3. विचारलेली सर्व माहिती भरावी.
  4. त्यावरती पासपोर्ट साईजचा फोटो चिकटवावा.
  5. आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्या जोडावी.
  6. जिथे गरज असेल तिथे स्वाक्षरी करावी.
  7. व्यवस्थित पूर्ण भरलेला अर्ज हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांकडे नेऊन जमा करावा. किंवा प्राचार्यांनी सांगितल्यास संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद येथे नेऊन जमा करावा.
  8. जिल्हा कार्यालयाकडून तुम्हाला अर्ज जमा केल्याची पोचपावती मिळेल ती जतन करून ठेवावी भविष्यात तुम्हाला याची गरज पडू शकते.

How to Apply ?

  1. Application for this scheme can be made through offline mode only.
  2. The concerned student should approach the Principal of his Industrial Training Institute for further information regarding this and get the application form.
  3. Fill all the information asked.
  4. Affix a passport size photo on it.
  5. All the necessary documents should be attached.
  6. Sign wherever required.
  7. The duly filled application form should be submitted to the Principal of the Industrial Training Institute. Or if directed by the Principal, take it to the concerned District Social Welfare Office and deposit it at the Zilla Parishad.
  8. You will receive an acknowledgment from the district office about the submission of the application, please keep it as you may need it in the future.
यासाठी लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • दोन पासपोर्ट साईझ फोटो.
  • सरकारी अधिकाऱ्याने अधिकृतरित्या दिलेले जातीचे प्रमाणपत्र [सदर प्रमाणपत्र शेड्युल कास्ट (SC) म्हणजेच अनुसूचित जाती चे असणे आवश्यक]
  • बँक डिटेल्स यामध्ये बँकेचे नाव, शाखेचे नाव आणि आय एफ एस सी (IFSC code) नंबर असावे.
  • दहावी बारावीचे गुणपत्रक तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयटीआय करत असल्याचा पुरावा म्हणून बोनाफाईड सर्टिफिकेट
  • उत्पन्नाचा दाखला (अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे उत्पन्न हे 65 हजार हून कमी असावे)

Documents required for this

  • Aadhaar Card PAN Card
  • Two passport size photographs.
  • Caste Certificate Officially Issued by a Government Officer [Schedule Caste (SC) Must Be]
  • Bank details should include bank name, branch name and IFSC code number.
  • 10th 12th mark sheet along with bonafide certificate as evidence of doing ITI in Industrial Training Institute
  • Income Proof (Income of head of applicant’s family should be less than 65 thousand)

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

https://sjsa.maharashtra.gov.in/en/scheme-category/education-training?&Submit=Submit&page=2

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या

पाचवा मजला, बॉम्बे लाईव्ह बिल्डिंग, वीर नरिमन रोड मुंबई – 400 001

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा

लँडलाईन क्रमांक 02222044186.

 

For more information visit the website below.

https://sjsa.maharashtra.gov.in/en/scheme-category/education-training?&Submit=Submit&page=2

For more information visit below address

5th Floor, Bombay Live Building, Veer Nariman Road Mumbai – 400 001

For more information contact them on the following number

Landline number 02222044186.

 

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *