Thursday, November 21, 2024
राज्य सरकार योजना

Mukhyamantri Annapurna Yojana: महाराष्ट्रातील महिलांना मिळणार इतके मोफत सिलिंडर; पाहा संपूर्ण माहिती

Mukhyamantri Annapurna Yojana: महाराष्ट्रात लाडली बहीण  योजनेनंतर शिंदे सरकार महिलांना आणखी एक भेट देणार आहे. आता महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. लाडली बेहन योजने’च्या लाभार्थ्यांनाही समाविष्ट करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन उपक्रमांतर्गत या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. याबाबत लवकरच अधिकृत आदेश काढण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागानेही ही योजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.



मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे फायदे | Advantages of Chief Minister Annapurna Yojana

महायुती सरकारने नुकतीच आपल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना (मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना) जाहीर केली आहे, जी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. महिलांसाठी हा मोठा दिलासा असून, आता सरकारने त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.



अर्थसंकल्पात महिलांसाठी नेमक्या काय-काय घोषणा?

  • सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची  सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी
  • दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
  • पिंक ई रिक्षा – १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य – ८० कोटी रुपयांचा निधी
  • “शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये
  • राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यासाठी ७८ कोटी रुपये
  • रुग्णांची विशेषतः गरोदर माता आणि बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका
  • जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर



  • ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला  घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ
  • लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ
  • महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
  • महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे  राज्यात आयोजन
  • ‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती
  • मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती
  • या निर्णयाचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार



Landagesuraj@9

I am a marathi blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *