Tuesday, July 16, 2024
शेतकरी योजना

16 वा हप्ता जाहीर, पीएम किसान सन्मान निधी योजना | pm kisan samman nidhi yojana 2024

Pm kisan samman nidhi yojana 2024 – कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत ही योजना सुरू झाली आहे. या योजनेचे नाव “पी एम किसान सन्मान निधी योजना” असे आहे.  पी एम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र सरकारची योजना असून त्याद्वारे सर्व अल्पभूधारक लहान मोठे शेतकरी यांना किमान उत्पन्नाच्या समर्थनार्थ म्हणून सहा हजार रुपये दरवर्षी दिले जातात. या योजनेअंतर्गत मिळणारा सोळावा हप्ता हा दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केला जाईल.

गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जात होते. कृषी मंत्रालयाने अर्थसंकल्पामध्ये बदल झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना 6000 रुपये ही रक्कम वाढवून 9000 रुपये करण्याचे ठरवले आहे.

 

नेमकी काय आहे पी एम किसान योजना? – pm kisan samman nidhi yojana 2024 

 

 1. दिनांक 1 डिसेंबर २०१८ रोजीपासून पीएम किसान योजनेची सुरुवात करण्यात आली.
 2. पी एम किसान योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक मदत केली जात होती.
 3. सुरुवातीला दोन हेक्टर पर्यंत असलेली शेतजमीन ची मर्यादा वाढवून सगळ्या शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना लागू करण्यात आली.
 4. पी एम किसान योजनेमार्फत दोन हजार रुपयाची रक्कम ही दर चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते.

 

Pm kisan samman nidhi yojana 2024 – यासाठी कोण पात्र राहील?

 

 • अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे
 • अर्जदार हा शेतकरी असून भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असेल किंवा महाराष्ट्र बाहेरी  कोणत्याही राज्याचा रहिवासी असेल तरीही चालेल फक्त अर्जदार भारतामधील असावा.
 • यापूर्वी असलेली दोन हेक्टरची मर्यादा हटवून आता या योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्याला घेता येणार आहे.

 

हेही वाचा  >>> किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत 3 लाख कर्ज | kisan credit card yojana antargat 3 lakh karj

 

यासाठी कोण पात्र नाही? (Pm kisan samman nidhi yojana 2024)

 

 1. जो अर्जदार शेतकरी मंत्रीपदावरती असेल किंवा संविधानिक कोणत्याही पदावर असेल तो पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
 2. जर अर्जदार शेतकरी जिल्हा परिषद अध्यक्ष विधान परिषद लोकसभा आमदार आणि राज्यसभा सदस्य किंवा नगराध्यक्ष असेल तो या योजनेसाठी पात्र नाही.
 3. जो अर्जदार शेतकरी हा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये अधिकारी पदावरती आहे तो पी एम किसान योजनेअंतर्गत या योजनेसाठी पात्र नाही.
 4. जो अर्जदार शेतकरी टॅक्स(प्राप्तिकर) भरतो तो शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही.
 5. ज्या अर्जदार शेतकऱ्याला पेन्शन म्हणून दहा हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम मिळत आहे.
 6. अर्जदार हा शेतकरी असून त्यासोबतच डॉक्टर, वकील सी ए किंवा इंजिनिअर आहे अशा शेतकऱ्यास पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

 

 

Pm kisan samman nidhi yojana 2024 – यासाठी लागणारी कागदपत्रे?

 

 • आधार कार्ड पॅन कार्ड
 • ओळखपत्र म्हणून मनरेगा कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आणि वोटिंग आयडी
 • बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड
 • अर्जदार शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण निर्णय संदर्भात काही माहिती किंवा अपडेट द्यावयाची असेल तर सरकार त्यांना क्रमांकावरती एसएमएस पाठवून त्याविषयी तपशील देईल.

 

असा करा अर्ज – pm kisan samman nidhi yojana 2024 

 

 1. संबंधित संकेतस्थळाला भेट द्या. 
 2. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा किंवा खाली दिलेल्या लिंक वर जा.
 3. https://pmkisan.gov.in/
 4. संबंधित संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला तेथे शेतकरी कॉर्नर हा पर्याय दिसेल.
 5. तेथे क्लिक करून त्यानंतर तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी असा पर्याय दिसेल.
 6. यावर क्लिक केल्यानंतर नोंदणी फॉर्म उघडेल त्यावरती आवश्यक ती माहिती आधार नंबर, प्रतिमा कोड विचारलेली सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा.
 7. नोंदणी केलेल्या अर्जाची एक प्रत काढून ठेवा. भविष्यात तुम्हाला याची गरज पडू शकते. 

 

 

 

पी एम किसान योजने (pm kisan samman nidhi yojana 2024) करिता तुम्ही पात्र झालात की नाही हे असे ओळखा

 

 • सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टर असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एसएमएस येईल
 • जर काही कारणास्तव एसएमएस आला नसेल तर तुम्ही संबंधित संकेतस्थळावरती जाऊन तपासू शकता
 • संबंधित संकेतस्थळावरती गेल्यानंतर तिथे फार्मर कॉर्नर यावरती क्लिक करून त्यानंतर येणाऱ्या पर्यायांमध्ये बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करावे.
 • तेथे तुमचा मोबाईल क्रमांक आणि आधार नंबर टाकून गेट डाटा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे
 • येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण नाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, शेतकऱ्याचे गाव, शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली तारीख आणि शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती तसेच आपल्याविषयी सविस्तर माहिती मिळते.

Find out if you are eligible for PM Kisan Yojana or not

 • First you will receive an SMS on the registered mobile number
 • If for some reason the SMS is not received then you can check by visiting the respective website
 • After going to the relevant website, click on Farmer’s Corner and then click on Beneficiary Status in the following options.
 • There you have to enter your mobile number and Aadhaar number and click on Get Data option
 • After clicking here you get full name of applicant farmer, aadhaar number, account number, village of farmer, date registered by farmer and personal information of farmer as well as detailed information about you.

 

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
https://pmkisan.gov.in/

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा
लँडलाईन क्रमांक :  155261  OR 1800775526

For more information visit the website below.
https://pmkisan.gov.in/

For more information contact them on the following number
Landline Number : 155261 OR 1800775526

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *