PM Modi Suryoday Yojana: माहीत आहे का की, केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू केली आहे. ही योजना सामान्य नागरिकांना सौर पॅनेल बसवण्यासाठी आर्थिक मदत आणि अनुदान प्रदान करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येतून या योजनेचा शुभारंभ केला होता. या योजनेचा मुख्य उद्देश एक कोटी घरांमध्ये सौर पॅनेल बसवणे आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे वीजबिल कमी होईल, तसेच भारत ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनेल. ही योजना भारताच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी आहे आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवून देशाला नवीकरणीय ऊर्जेचा अग्रगण्य वापरकर्ता बनवेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज –
सौर पॅनेल बसवण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारल्यानंतरच लाभार्थ्यांना अनुदान मिळेल. या योजनेअंतर्गत प्रति किलोवॅट 18,000 ते 20,000 रुपयांचे अनुदान दिले जाते.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे–
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक खाते क्रमांक
- मोबाइल क्रमांक
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- वीजबिल
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता–
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 ते 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
- अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असावीत.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
- होमपेजवर ‘अर्ज करा’ पर्याय निवडा.
- तुमचे राज्य आणि जिल्हा निवडून आवश्यक माहिती भरा.
- वीजबिल क्रमांक टाका.
- वीज खर्चाची माहिती आणि सौर पॅनेलची तपशील भरा.
- छताचा आकार मोजून त्यानुसार सौर पॅनेल निवडा आणि अर्ज सबमिट करा.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सरकार योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल.
