निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी, पीपीएफ याकरिता आहे महत्त्वाचे | Why PPF Matters for Post-Retirement Planning
Why PPF Matters for Post-Retirement Planning: नोकरी करत असतानाच अनेकांच्या मनात सेवानिवृत्तीनंतर आपले कसे होणार आणि तेव्हा आपण घरखर्च कसा भागवणार, असे अनेक विचार येऊ लागतात. सरकारी नोकरी असेल तर ठीक आहे, पण खासगी नोकरीमध्ये वयाच्या ५० वर्षांनंतर खर्च कसे भागवायचे, हा प्रश्न समोर उभा राहतो. त्यामुळेच लोक सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन करायला सुरुवात करतात. पण त्यासाठी किती पैसे लागतात आणि पैसे कुठे गुंतवायचे, याचा विचार आतापासूनच करायला हवा ना? तर आज आपण या लेखातून पीपीएफ (PPF) काढणे महत्त्वाचे का आहे हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
Why PPF Matters for Post-Retirement Planning
पीपीएफ(Public Provident Fund) महत्त्वाचे का आहे?
निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक(Investment) करणे गरजेचे आहे. यासाठी सरकारच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे पीपीएफ (PPF), म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पीपीएफ हा गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही छोटी किंवा मोठी गुंतवणूक करू शकता आणि त्यावर अधिक व्याजदर मिळवू शकता. पण लक्षात ठेवा की, व्याज मिळवण्यासाठी, पीपीएफ ठेवी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत भरल्या पाहिजेत. व्याजाची गणना ५ तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस असलेल्या सर्वात कमी शिल्लक रकमेवर आधारित असते.
पीपीएफ रक्कम कधी, किती वर्षांनी काढता येते(When PPF amount can be withdrawn)?
पीपीएफ योजनेतून पैसे काढण्यासंबंधीचे काही महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत:
- पीपीएफ योजनेतील रक्कम आर्थिक वर्षात फक्त एकदाच काढता येते.
- खाते उघडल्याच्या वर्षाचा समावेश वगळून, तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यातून ५ वर्षे पूर्ण केल्यानंतर, सातव्या वर्षापासून पैसे काढू शकता.
- तुम्ही पीपीएफ योजनेतील एकूण शिल्लक रकमेपैकी ५० टक्के रक्कम काढू शकता किंवा योजना सुरू झाल्यानंतर चौथ्या वर्षाच्या अखेरीस तुमच्याकडे असलेल्या रकमेपैकी ५०% या दोघांपैकी जी रक्कम कमी आहे, तीच काढता येईल.